Sanjay Singh Gets Bail: दारू घोटाळा प्रकरणात आप खासदार संजय सिंह यांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. दिल्ली दारू धोरणाशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी ते सहा महिने तुरुंगात होते. त्यांना जामीन मंजूर झाला आहे.

Photo Credit - x

Sanjay Singh Gets Bail: आम आदमी पार्टी(AAP)चे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. दिल्ली(Delhi) दारू धोरणाशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी ते सहा महिने तुरुंगात होते. संजय सिंग यांना जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने सांगितले की, ते राजकीय कार्यातही सहभागी होऊ शकतील. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आप खासदाराच्या वकिलाचा युक्तिवाद मान्य केला की संजय सिंह यांच्याकडून एकही पैसा जप्त करण्यात आलेला नाही आणि त्याच्यावर 2 कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपांची चौकशी केली जाऊ शकते. (हेही वाचा :K Kavitha Arrested: दिल्ली दारू घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई; माजी मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या के कविता यांना अटक )

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement