Sandip Ghosh Arrested: वैद्यकीय आस्थापनातील 'आर्थिक गैरव्यवहार' प्रकरणी आरजी कार रुग्णालयाचा माजी प्राचार्य संदीप घोषला अटक; 15 दिवसांहून अधिक काळापासून सुरु होती चौकशी
मात्र सोमवारी सायंकाळी सीबीआयचे अधिकारी घोष याला घेऊन सीजीओ संकुलातून बाहेर पडले.
Sandip Ghosh Arrested: प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणाचा आणि पश्चिम बंगालच्या सरकारी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील आर्थिक अनियमिततेचा तपास करणाऱ्या सीबीआयने, हॉस्पिटलचा माजी प्राचार्य संदीप घोष याला अटक केली आहे. घोष याला त्याच्या कार्यकाळात आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील आर्थिक अनियमिततेच्या चौकशीत अटक करण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सीबीआय संदीप घोषची चौकशी करत होती. मिळालेल्या माहितीनुसार, घोष याला आर्थिक अनियमिततेशी संबंधित एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सीबीआय एफआयआरमध्ये, कथित आर्थिक अनियमिततेच्या संदर्भात कलम 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याआधी प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात सीबीआयने वैद्यकीय महाविद्यालयाचा माजी प्राचार्य संदीप घोष याची पॉलीग्राफ चाचणी केली होती. मात्र, त्यात काय माहिती समोर आली आहे, याचा खुलासा करण्यात आलेला नाही. (हेही वाचा: Kolkata Rape Case: कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात रुग्णालयाच्या प्राचार्यांचा राजीनामा)
आरजी कार रुग्णालयाचा माजी प्राचार्य संदीप घोषला अटक-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)