Sandeshkhali Case: संदेशखाली पीडितेने TMC कार्यकर्त्यांवर दाखल केलेला गुन्हा मागे घेतला; म्हणाली- 'भाजपने टाकला होता दबाव'
महिलेचा दावा आहे की, भाजपने तिच्यावर कोऱ्या कागदावर सह्या करण्यासाठी आणि बलात्काराची तक्रार नोंदवण्यासाठी दबाव आणला होता.
Sandeshkhali Case: पश्चिम बंगालमधील संदेशखाली प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. NDTV ने दिलेल्या वृत्तानुसार संदेशखाली प्रकरणाशी संबंधित एका महिलेने टीएमसी (TMC) कार्यकर्त्यांवर दाखल केलेला गुन्हा मागे घेतला आहे. महिलेचा दावा आहे की, भाजपने तिच्यावर कोऱ्या कागदावर सह्या करण्यासाठी आणि बलात्काराची तक्रार नोंदवण्यासाठी दबाव आणला होता. तत्पूर्वी बुधवारी, टीएमसीने संदेशखालीतील भाजप नेत्यांवर आरोप केला होता की, ज्या महिला पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांविरुद्ध पोलीस तक्रारी मागे घेण्याची मागणी करत आहेत, अशा महिलांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.
सध्या पश्चिम बंगालमध्ये गेल्या दोन दिवसांपासून एका कथित स्टिंग व्हिडिओवरून भाजप आणि टीएमसी नेते आमनेसामने आले आहेत. टीएमसीच्या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दिसत आहे. व्हिडिओमध्ये ही व्यक्ती दावा करत आहे की, 'संदेशखाली येथील एकही महिला बलात्काराची शिकार झालेली नाही. तिथल्या महिला इतके दिवस जे आंदोलन करत आहेत, त्यामागे भाजपच्या नेत्यांचा हात आहे. त्यांनीच हा महिलांना प्रशिक्षण देऊन तयार केले होते.' (हेही वाचा: HD Revanna: अपहरण प्रकरणी एचडी रेवण्णाला 14 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)