Rupali Ganguly Joins BJP: 'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुली राजकारणात उतरली; नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत केला भाजपमध्ये प्रवेश
तिने भाजप नेते विनोद तावडे आणि अनिल बलूनी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला.
Rupali Ganguly Joins BJP: ‘अनुपमा’ आणि ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ मधील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली टीव्ही स्टार रुपाली गांगुली हिने बुधवारी भारतीय राजकारणात प्रवेश केला. तिने भाजप नेते विनोद तावडे आणि अनिल बलूनी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. दिल्ली येथे रुपालीच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. टीव्ही शो 'अनुपमा'ने रुपाली गांगुलीला रातोरात स्टार बनवले. 2020 मध्ये, कोरोना महामारीच्या काळात सुरू झालेल्या या शोने अनेक विक्रम मोडले आणि 'सर्वाधिक पाहिलेला' आणि आता प्रेक्षकांचा 'सर्वाधिक आवडलेला' शो बनला. या वर्षाच्या सुरुवातीला रुपालीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ देखील पोस्ट केला होता, ज्यामध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे तिचे 'फॅन गर्ल' क्षण शेअर केले होते.
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)