देशांतर्गत प्रवासासाठी RTPCR चाचणीची आवश्यकता नाही; राज्यांबाबत राज्य सरकार घेऊ शकतात निर्णय- Civil Aviation Minister Jyotiraditya Scindia
आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आरोग्य मंत्रालयासोबत नियम तयार केले गेले आहेत
देशांतर्गत प्रवासासाठी आता RTPCR चाचणीची आवश्यकता नाही, परंतु अनेक राज्यांचे स्वतःचे काही नियम आहेत. जरा का आपल्या राज्यात कोविड प्रकरणे जास्त आहेत असे वाटत असेल आणि राज्य सरकारला त्याबाबत खबरदारी घ्यायची असेल तर ते प्रवाशांना RTPCR चाचणी बंधनकारक करू शकतात. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ही माहिती दिली.
आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आरोग्य मंत्रालयासोबत नियम तयार केले गेले आहेत. त्यानुसार एकतर लसीकरण प्रमाणपत्रे अपलोड करायची आहेत किंवा प्रवासाच्या 72 तास आधीच्या RTPCR चाचणीचा निकाल अपलोड करायचा आहे. कोविड 19 नंतर, देशाने आज दैनंदिन 4 लाख प्रवासी टप्पा पार केला आहे. हा एक मोठा विक्रम आहे.