RTPCR Test: 'या' देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सुचना
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून विशेष नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यानुसार चीन, हॉंगकॉंग,जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड या देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांना आजपासून आटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.
जगभरात मोठ्या उत्साहात नव्या वर्षाचं स्वागत होत असलं तरी कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटने देखील पुन्हा एकदा जगातील विविध देशात डोकवर काढल्याचं दिसत आहे. त्याच पार्श्वभुमिवर भारतात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून विशेष नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यानुसार चीन, हॉंगकॉंग,जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड या देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांना आजपासून आटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. तरी प्रवास करण्यापूर्वी या प्रवाशांना त्यांचा आरटीपीसीआर रिपोर्ट एअर सुविधा पोर्टलवर अपलोड करणं बंधनकारक असणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)