'आम्ही उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो', Govt's Caste Based Survey विरोधातील याचिका फेटाळल्यावर लालू प्रसाद यादव यांची प्रतिक्रिया

बिहार सरकारच्या जात आधारित सर्वेक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका पाटणा हायकोर्टाने फेटाळली. त्यानंतर आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे की, आम्ही उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. हा केवळ निर्णय नसून गरिबांसाठीचा निर्णय आहे. यामुळे त्यांच्यासाठी दरवाजे खुले होतील.

Lalu Prasad Yadav (फोटो सौजन्य - PTI)

बिहार सरकारच्या जात आधारित सर्वेक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका पाटणा हायकोर्टाने फेटाळली. त्यानंतर आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे की, आम्ही उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. हा केवळ निर्णय नसून गरिबांसाठीचा निर्णय आहे. यामुळे त्यांच्यासाठी दरवाजे खुले होतील. त्यांच्या सर्वेक्षणानंतर त्यांची आर्थिक स्थिती कळेल आणि त्या आधारे सरकार त्यांच्यासाठी योजना तयार करेल आणि विकासाची ही दारे खुली केली जातील. मी मुख्यमंत्री आणि तेजस्वी यादव यांचे आभार मानतो, त्यांनी कठोर परिश्रम केले. दरम्यान, I.N.D.I.A. ची बैठक केव्हा होणार असे विचारले, या वेळी त्यांनी सांगितले की, लवकरच होईल. आम्ही सर्वजण त्या बैठकीला जाणार आहोत, असेही ते म्हणाले.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement