COVID 19 In India: देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ; महाराष्ट्र सह या 5 राज्यांना सतर्क राहण्याचे केंद्राचे निर्देश
महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा तामिळनाडू, केरळ, आणि कर्नाटकच्या प्रमुख सचिवांना पत्र लिहून केंद्राने सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
भारतामध्ये पुन्हा कोरोना रूग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा तामिळनाडू, केरळ, आणि कर्नाटकच्या प्रमुख सचिवांना पत्र लिहून सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या कोविड सोबतच H3N2 चे वाढते रूग्ण देखील चिंता वाढवणारी बाब आहे. पण वेळीच निदान झाल्यास त्यावर मात करणं शक्य असल्याने सरकारकडून वेळीच उपचार सुरू करण्यासाठी निदान करून घेण्याचे आणि नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)