Revised Timings of Mumbai Division Trains: पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेससह मध्य रेल्वेच्या अनेक गाड्यांच्या वेळा बदलल्या; जाणून घ्या नवे वेळापत्रक
हे बदल 24-26 ऑगस्ट 2024 पासून लागू होतील. मध्य रेल्वेने प्रवाशांनी या बदलांची कृपया नोंद घ्यावी आणि त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे, अशी विनंती केली आहे.
Revised Timings of Mumbai Division Trains: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने वक्तशीरपणा आणि स्ट्रीम लाइनिंग ऑपरेशन्स सुधारण्यासाठी, त्यांच्या अधिकारक्षेत्रात चालणाऱ्या अनेक गाड्यांच्या वेळेत बदल जाहीर केले आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई सीएसटीच्या मार्गावरील तीन महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळापत्रकांवर या बदलाचा परिणाम होणार आहे. यामध्ये ट्रेन क्रमांक 11008 पुणे-सीएसएमटी मुंबई डेक्कन एक्स्प्रेस (दैनिक), ट्रेन क्रमांक 16352 नागरकोइल-सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस (द्वि-साप्ताहिक), ट्रेन क्रमांक 16340 नागरकोइल-सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस (आठवड्यातून चार वेळा), ट्रेन क्रमांक 16332 तिरुवनंतपुरम-सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस (साप्ताहिक) या गाड्यांचा समावेश आहे. हे बदल 24-26 ऑगस्ट 2024 पासून लागू होतील. मध्य रेल्वेने प्रवाशांनी या बदलांची कृपया नोंद घ्यावी आणि त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे, अशी विनंती केली आहे. (हेही वाचा: Cockroach Found in Meal on Train: वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रवाशाला जेवणात आढळला झुरळ, तक्रार दाखल)
मध्य रेल्वेच्या अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)