टोमॅटोसह खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे, जुलै 2023 मध्ये, किरकोळ महागाईचा दर पुन्हा 7 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. जुलैमध्ये किरकोळ महागाई 7.44 टक्के आहे, जी जून 2023 मध्ये 4.81 टक्के होती. आकडेवारीनुसार, शहरी भागात किरकोळ महागाई दर 7.63 टक्के तर ग्रामीण भागात 7.20 टक्के आहे. सांख्यिकी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये अन्नधान्य महागाई दर 11.51 टक्के होता, जो जूनमध्ये 4.49 टक्के होता. म्हणजेच एकाच महिन्यात खाद्यपदार्थांच्या महागाईच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. जुलै महिन्यात भाज्यांच्या महागाईचा दर 37.34 टक्के होता, जो जून 2023 मध्ये -0.93 टक्के होता. गेल्या वर्षी मे 2022 मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 7 टक्क्यांच्या पुढे गेल्यानंतरच, RBI ने पॉलिसी रेट म्हणजेच रेपो रेट वाढवण्यास सुरुवात केली. रेपो दर 4 टक्क्यांवरून 6.50 टक्के करण्यात आला. (हेही वाचा: 'Har Ghar Tiranga' Campaign: 'हर घर तिरंगा' मोहिमेद्वारे 600 कोटी रुपयांचा व्यवसाय, तर 10 लाख लोकांना रोजगार मिळण्याचा अंदाज)

(SocialLY brings you all the latest breaking news, viral trends and information from social media world, including Twitter, Instagram and Youtube. The above post is embeded directly from the user's social media account and LatestLY Staff may not have modified or edited the content body. The views and facts appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY, also LatestLY does not assume any responsibility or liability for the same.)