Republic Day Parade 2025: प्रजासत्ताक दिन परेड 2025 च्या सर्वोत्कृष्ट संचलन पथकांचे आणि चित्ररथांचे निकाल जाहीर; उत्तर प्रदेशला 'महा कुंभ 2025' साठी मिळाला पहिला क्रमांक

सेवा आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF)/अन्य सहाय्यक दल आणि विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश (UT) आणि केंद्र सरकारच्या मंत्रालये/विभागांच्या मार्चिंग पथकांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी न्यायाधीशांचे तीन पॅनेल तयार करण्यात आले. पॅनेलने त्यांचे निकाल जाहीर केले आहेत.

Republic Day Parade 2025: प्रजासत्ताक दिन परेड 2025 च्या सर्वोत्कृष्ट संचलन पथकांचे आणि चित्ररथांचे निकाल जाहीर; उत्तर प्रदेशला 'महा कुंभ 2025' साठी मिळाला पहिला क्रमांक
Republic Day Parade 2025

Republic Day Parade 2025: प्रजासत्ताक दिन परेड 2025 च्या सर्वोत्कृष्ट संचलन पथकांचे आणि चित्ररथांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. सेवा आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF)/अन्य सहाय्यक दल आणि विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश (UT) आणि केंद्र सरकारच्या मंत्रालये/विभागांच्या मार्चिंग पथकांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी न्यायाधीशांचे तीन पॅनेल तयार करण्यात आले. पॅनेलने त्यांचे निकाल जाहीर केले आहेत. जम्मू आणि काश्मीर रायफल्सची तुकडी ही सेवेतील सर्वोत्कृष्ट मार्चिंग तुकडी ठरली आहे, तर दिल्ली पोलिसांची मार्चिंग पथक हे सीएपीएफ/इतर सहाय्यक दलातील सर्वोत्तम मार्चिंग पथक ठरले आहे.

चित्ररथांच्या बाबतीत, प्रथम क्रमांक महा कुंभ 2025 साठी उत्तर प्रदेशला मिळाला आहे. दुसरा क्रमांक त्रिपुराला ‘14 देवतांची पूजा’ या चित्ररथाला मिळाला आहे, तर तिसरा क्रमांक आंध्र प्रदेशला त्यांच्या पर्यावरण-अनुकूल लाकडी खेळणी चित्ररथाला मिळाला आहे. केंद्रीय मंत्रालये/विभागांच्या चित्ररथामध्ये आदिवासी व्यवहार मंत्रालय विजेते असून, त्यांनी आदिवासी गौरव वर्ष या थीमवर चित्ररथ तयार केला होता. (हेही वाचा: Padma Awards 2025: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा; कोणाला मिळाला पद्मश्री पुरस्कार? जाणून घ्या)

प्रजासत्ताक दिन परेड 2025 च्या सर्वोत्कृष्ट संचलन पथकांचे आणि चित्ररथांचे निकाल-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 29, 2025 02:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).