Ravi Kishan's Daughter To Join Army: अभिनेता, खासदार रवि किशनची लेक Ishita Shukla, Agnipath Scheme अंतर्गत आर्मी मध्ये होणार सहभागी - रिपोर्ट्स
इशिता यावर्षी 26 जानेवारी रोजी एनसीसीकडून झालेल्या परेडमध्ये सहभागी झालेल्या 148 महिलांपैकी एक होती.
भोजपुरी स्टार आणि खासदार रवी किशन यांची लेक आता सैन्यात दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे. भाजपा खासदार रवी किशन यांची 21 वर्षीय लेक इशिता किशन NCC Cadet आहे. केंद्र सरकारच्या Agnipath Scheme अंतर्गत इशिता आता सैन्यात दाखल होईल. मीडीया रिपोर्ट्सनुसार इशिता पुढील 4 वर्षांसाठी लष्करात असणार आहे. ज्यामध्ये प्रशिक्षणाचे साडेतीन महिने आणि पुढील 3.5 वर्ष सैन्यात असणार आहे. रवी किशन यांनी वर्षभरापूर्वी ट्वीट करून लेकीने आपल्याला अग्निपथ मध्ये सहभागी होण्याची इच्छा बोलून दाखवली असल्याचं ट्वीट केलं होतं. नक्की वाचा: Agnipath Scheme: सावधान! अग्निपथ योजनेची व्हॉट्स अॅपद्वारे बनावट नोंदणी, जाणून घ्या योग्य आणि अधिकृत नोंदणी स्थळ .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)