Ram Mandir Invitation Card Video: राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी निमंत्रण पत्रिका पाठवण्यास सुरुवात; व्हायरल झाला कार्डचा सुंदर व्हिडिओ (Watch)
प्रभू रामलल्लाच्या अभिषेक कार्यक्रमापूर्वी रामभक्तांना अयोध्येत येण्याचे निमंत्रण देण्यासाठी अक्षतांसह निमंत्रणे पाठवली जात आहेत.
Ram Mandir Invitation Card Video: अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी अक्षत निमंत्रण मोहीम सुरू झाली आहे. या अंतर्गत प्रभू रामलल्लाच्या अभिषेक कार्यक्रमापूर्वी रामभक्तांना अयोध्येत येण्याचे निमंत्रण देण्यासाठी अक्षतांसह निमंत्रणे पाठवली जात आहेत. हे अक्षत निमंत्रण भारतातील विविध भागातील सुमारे पाच लाख गावांमध्ये आणि मंदिरांमध्ये पाठवले जात आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी 11 वाजल्यापासून अक्षत निमंत्रण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. अशात आता सोशल मिडियावर श्री राम मंदिराच्या अभिषेकासाठीचे आमंत्रण पत्र व्हायरल होत आहे. श्री रामाचे चित्र असलेले हे निमंत्रण पत्र अतिशय सुंदर दिसत आहे.
(हेही वाचा: Ayodhya Surya Stambh Viral Video: राम नगरी अयोध्या सजणार सूर्यस्तभांनी, तीस फूट उंचीचे खांब शहराच्या मुख्य रस्त्यावर)