Rajpal Yadav on Ranveer Allahbadia : रणवीर अलाबादियाच्या वादग्रस्त विधानावर राजपाल यादव संतापला; म्हणाला, ‘आई-वडीलांनाही नाहीत सोडत’ (Watch Video)

समय रैना याच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’शो मधील रणवीर अलाबादियाच्या वादग्रस्त विधानावर कलाकारही नाराजी व्यक्त करत आहेत. राजपाल यादवने रणवीर अलाबादियाच्या वक्तव्यावर निराशा साधला आहे.

PC-X

यूट्यूबर रणवीर अलाबादिया(Ranveer Allahbadia), उर्फ ​​बीअरबायसेप्स, स्टँडअप कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' (India's Got Talent) शोमध्ये पालकांबद्दल असंवेदनशील टिप्पणी केल्यानंतर नेटिझन्स त्याच्यावर टीका करत आहेत. या विरोधाता पोलिस तक्रारी दाखल झाल्या आहेत. काल मुंबई पोलीस त्याच्या घरी गेले होते. आता बॉलीवूड अभिनेता राजपाल यादवनेही (Rajpal Yadav) या प्रकरणावर आपले विचार मांडले आहेत.

राजपाल यादव काय म्हणाला?

झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत, बॉलीवूडचा कॉमेडी आयकॉन राजपाल यादव म्हणाला की, "असे व्हिडिओ पाहणे देखील लज्जास्पद आहे. आपला देश एक सांस्कृतिक देश आहे. जिथे आई, वडील, शिक्षक आणि जगाचा आदर केला जातो. आपण असे व्हिडिओ याआधी पाहिले आहेत. असे व्हिडिओ पाहणे लज्जास्पद आहे."

राजपाल यादव

View this post on Instagram

A post shared by Zoom TV (@zoomtv)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now