Rajasthan: कोटा येथे रामनवमी उत्सवादरम्यान स्टंट करताना मोठा अपघात; विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू
यात जखमींचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी रामनवमीची मिरवणूक काढली जात असताना तिघांनी विजेच्या तारेला स्पर्श केला.
कोटाच्या कोटरा येथील रामनवमीच्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडली. मिरवणुकीदरम्यान विजेच्या तारेला स्पर्श होऊन तीन भाविकांचा मृत्यू झाला. वृत्तानुसार, या घटनेत अर्धा डझन लोक गंभीररीत्या भाजले आहेत. ही घटना कोटाच्या सुलतानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोटरा दीपसिंग गावातील आहे. यात जखमींचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी रामनवमीची मिरवणूक काढली जात असताना तिघांनी विजेच्या तारेला स्पर्श केला. पोलिसांनी याबाबत माहिती दिली.
Three die due to electrocution while performing stunts during Ram Navami celebration in Rajasthan's Kota: Police
— Press Trust of India (@PTI_News) March 30, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 30, 2023 11:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

