Rajasthan: महिला न्यायाधीशाच्या प्रतिमा मॉर्फ करुन धमकी देत २० लाख रुपयांची मागणी
महिला न्यायाधीशाची छायाचित्रे मॉर्फ करुन त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देत 20 लाख रुपये मागीतल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. अज्ञातांकडून हा धक्कादायक प्रकार करण्यात आला आहे. त्यांनी महिला न्यायाधीशांच्या कुटुंबीयांना अपमानीत करण्याचीही धमकी दिली.
महिला न्यायाधीशाची छायाचित्रे मॉर्फ करुन त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देत 20 लाख रुपये मागीतल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. अज्ञातांकडून हा धक्कादायक प्रकार करण्यात आला आहे. त्यांनी महिला न्यायाधीशांच्या कुटुंबीयांना अपमानीत करण्याचीही धमकी दिली. महिला न्यायाधीशांनी जयपूर येथील सदर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तक्रारीची तातडीने नोंद घेऊन तपास सुरु केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महिला न्यायाधीशांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपींनी त्यांची छायाचित्रे सोशल मीडियावरुन काढली आणि मॉर्फ केली. ज्यात अश्लीलता आहे. मॉर्फ केलेल्या फोटोंचा एक लिफाफा कोर्टातच न्यायाधीशांकडे पाठविण्यात आला. ब्लॅकमेलरने कोर्टरूममध्ये तीन मॉर्फ केलेल्या चित्रांसह एक पार्सल पाठवले. नंतर त्यांनी ती तिच्या शासकीय निवासस्थानीही पाठवली. दोन्ही पार्सलमध्ये धमकीची पत्रे होती आणि 20 लाख रुपयांची मागणी केली होती.