राहुल गांधी रायबरेली लोकसभा जागा ठेवणार, वायनाड सोडणार; काँग्रेस अध्यक्ष Mallikarjun Kharge यांची माहिती (Watch Video)
राहुल गांधी वायनाडची जागा सोडतील आणि रायबरेली स्वतःकडे ठेवतील. यानंतर प्रियंका गांधी वाड्रा या वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार असतील.
Rahul Gandhi to Keep Raebareli Lok Sabha Seat: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशभरातील राजकीय पक्ष अंतर्गत बैठका घेऊन भविष्याची रणनीती तयार करत आहेत. या मालिकेत सोमवारी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन राहुल गांधी यांच्या संसदीय जागेवर निर्णय घेतला. बैठकीनंतर खरगे म्हणाले की, राहुल गांधी वायनाडची जागा सोडतील आणि रायबरेली स्वतःकडे ठेवतील. यानंतर प्रियंका गांधी वाड्रा या वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार असतील. राहुल गांधी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुका या केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशमधील रायबरेली मतदारसंघातून लढवल्या होत्या आणि त्यांनी दोन्ही ठिकाणांहून विजय मिळवला होता. आता त्यांनी यूपीच्या रायबरेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला असून, वायनाडची जागा सोडली आहे. प्रियंका वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत. (हेही वाचा: भाजप लोकसभेचे सभापतीपद कायम ठेवण्याची शक्यता; मित्रपक्षांना उपसभापतीपद देणार, सुत्रांची माहिती)
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)