राहुल गांधी रायबरेली लोकसभा जागा ठेवणार, वायनाड सोडणार; काँग्रेस अध्यक्ष Mallikarjun Kharge यांची माहिती (Watch Video)

राहुल गांधी वायनाडची जागा सोडतील आणि रायबरेली स्वतःकडे ठेवतील. यानंतर प्रियंका गांधी वाड्रा या वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार असतील.

राहुल गांधी रायबरेली लोकसभा जागा ठेवणार, वायनाड सोडणार; काँग्रेस अध्यक्ष Mallikarjun Kharge यांची माहिती (Watch Video)
Rahul Gandhi to Keep Raebareli Lok Sabha Seat

Rahul Gandhi to Keep Raebareli Lok Sabha Seat: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशभरातील राजकीय पक्ष अंतर्गत बैठका घेऊन भविष्याची रणनीती तयार करत आहेत. या मालिकेत सोमवारी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन राहुल गांधी यांच्या संसदीय जागेवर निर्णय घेतला. बैठकीनंतर खरगे म्हणाले की, राहुल गांधी वायनाडची जागा सोडतील आणि रायबरेली स्वतःकडे ठेवतील. यानंतर प्रियंका गांधी वाड्रा या वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार असतील. राहुल गांधी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुका या केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशमधील रायबरेली मतदारसंघातून लढवल्या होत्या आणि त्यांनी दोन्ही ठिकाणांहून विजय मिळवला होता. आता त्यांनी यूपीच्या रायबरेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला असून, वायनाडची जागा सोडली आहे. प्रियंका वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत. (हेही वाचा: भाजप लोकसभेचे सभापतीपद कायम ठेवण्याची शक्यता; मित्रपक्षांना उपसभापतीपद देणार, सुत्रांची माहिती)

पहा व्हिडिओ- 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 17, 2024 08:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).