Rahul Gandhi यांनी पंजाबमध्ये भारत जोडो यात्रेत सुरक्षेत चूक झाल्याचं वृत्त फेटाळलं; उत्साहात तरूण भेटल्याची दिली माहिती

राहुल गांधीच्या गळ्यात पडलेल्या मुलाबद्दल त्यांनीच खुलासा करत तो केवळ उत्साहात भेटायला आला असल्याचं म्हटलं आहे.

Rahul Gandhi यांनी पंजाबमध्ये भारत जोडो यात्रेत सुरक्षेत चूक झाल्याचं वृत्त फेटाळलं;  उत्साहात तरूण भेटल्याची दिली माहिती
Rahul Gandhi | Twitter

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज पंजाबच्या होशियारपूर मध्ये चालत असताना एक तरूण अचानक राहुल गांधींच्या गळ्यात पडला. दरम्यान यावरून राहुल गांधींच्या यात्रेमध्ये सुरक्षेत चूक झाली असल्याच्या चर्चा रंगत आहेत. पण खुद्द राहुल गांधींनी हे वृत्त फेटाळलं आहे. तो तरूण उत्साहात भेटायला आला त्यामुळे गळ्यात पडला असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी मीडीयाशी बोलताना दिलं आहे. सुरक्षा रक्षकांनी त्याची चौकशी केली आहे तो केवळ उत्साहात भेटायला आलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नक्की वाचा: पंजाब मध्ये दाखल Bharat Jodo Yatra मध्ये Rahul Gandhi यांच्या सुरक्षेत चूक; एक व्यक्ती थेट गळाभेटीसाठी  घुसला (Watch Video).

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 17, 2023 03:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).