PM Modi Tamil Nadu Roadshow: तामिळनाडूमध्ये PM मोदींचा रोड शो, पंतप्रधानांनी एका वृद्ध महिलेचे हात जोडून केले स्वागत

ज्या महिलेचे पंतप्रधानांनी रोड शो दरम्यान हात जोडून स्वागत केले. स्वागत करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तामिळनाडूच्या (Tamilnadu) दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी पंतप्रधानांनी चेन्नई, तामिळनाडूमध्ये रोड शो केला. रोड शोमध्ये मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेऊन पंतप्रधानांचे स्वागत केले. चेन्नईमध्ये पंतप्रधानांनी चार किमी लांबीचा रोड शो केला. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या समर्थकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. पीएम मोदींच्या रोड शोदरम्यान एक वृद्ध महिलाही पीएम मोदींचा रोड शो पाहण्यासाठी घरातून बाहेर पडली. ज्या महिलेचे पंतप्रधानांनी रोड शो दरम्यान हात जोडून स्वागत केले. स्वागत करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)