15th BRICS Summit: पंतप्रधान मोदी तीन दिवसांच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी रवाना, ब्रिक्स शिखर परिषदेत होणार सहभागी
ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन 15 व्या ब्रिक्स परिषदेला हजेरी लावणार आहेत.
15 व्या ब्रिक्स बैठकीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी मंगळवारी भारतातून दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले. भारतातून दक्षिण आफ्रिकेला रवाना झाल्यानंतर पंतप्रधान थोड्याच वेळात जोहान्सबर्गला पोहोचतील. जिथे पंतप्रधानांचे जल्लोषात स्वागत होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी 22 ते 24 ऑगस्टदरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत. ब्रिक्स बैठकीत पंतप्रधान मोदी अनेक देशांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन 15 व्या ब्रिक्स परिषदेला हजेरी लावणार आहेत.
पाहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)