LPG Price Hike: बजेट दिवशी आज कमर्शिअल गॅस सिलेंडर च्या दरात वाढ; पहा 1 फेब्रुवारीपासूनचे नवे दर
कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये मेट्रो शहरात आज पासून 14 रूपयांनी वाढ जाहीर करण्यात आली आहे.
आज केंद्रीय अर्थसंकल्प मांडला आहे. दरम्यान आजचा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प असल्याने सर्वसामन्यांना दिलासादायक घोषणांची अपेक्षा आहे. पण फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये मेट्रो शहरात 14 रूपयांनी वाढ जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेलचे खाणं महाग होण्याची शक्यता आहे. तर घरगुती सिलेंडरच्या दरात मात्र या महिन्यातही कोणतीही वाढ झालेली नाही. आजपासून मुंबई मध्ये कमर्शिअल गॅस सिलेंडर 1723.50 रूपये, दिल्लीत रु. 1769.50 कोलकातामध्ये रु. 1887.00 आणि चेन्नई मध्ये 1937 रुपये झाला आहे.