Pravasi Bharatiya Diwas 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'भारतीय प्रवासी दिवस' च्या शुभेच्छा देत मानले NRI च्या योगदानाचे आभार

9 जानेवारी हा दिवस भारतीय प्रवासि दिवस म्हणून साजारा केला जातो. 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधीजी आफ्रिकेतून भारतात परतले होते त्यामुळे हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो.

PM Modi | Twitter

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार, 9 जानेवारी रोजी प्रवासी भारतीय दिवसाच्या  शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच जगभरातील अनिवासी भारतीयांच्या कर्तृत्वाचा आणि वचनबद्धतेचा गौरव करण्यासाठी हा दिवस असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका ट्विटमध्ये पीएम मोदींनी लिहिले, "प्रवासी भारतीय दिवसाच्या शुभेच्छा. जगभरात स्थायिक झालेल्या भारतीयांच्या योगदान आणि यश साजरे करण्याचा हा दिवस आहे. आपला समृद्ध वारसा जतन करण्यासाठी आणि जागतिक संबंध मजबूत करण्यासाठी त्यांचे समर्पण प्रशंसनीय आहे. भारत जगभर, एकता आणि विविधतेची भावना वाढवत आहे."

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement