Pragati Jagdale On Operation Sindoor: ' ज्या प्रकारे आमचं कुंकू पुसलं त्याला ऑपरेशन सिंदूर योग्य प्रत्युत्तर'; मोहिमेचं नावं ऐकून संतोष जगदाळे यांच्या पत्नी भावूक

' ज्या प्रकारे आमचं कुंकू पुसलं त्याला ऑपरेशन सिंदूर योग्य प्रत्युत्तर' असल्याचं म्हणताना त्यांनी ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकून डोळ्यात अश्रू तरळल्याची भावना व्यक्त केली आहे.

Pragati Jagdale | X @ANI

पहलगाम च्या दहशतवादी हल्ल्याला आज 15 दिवसांनंतर भारताच्या तिन्ही दलांनी मिळून ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. Operation Sindoor च्या माध्यमातून भारताने पाकिस्तान मध्ये 9 दहशतवादी तळांवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान पुण्याच्या संतोष जगदाळे यांना पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी ठार केल्यानंतर आज त्यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना सरकारच्या या प्रत्युत्तरावर समाधान व्यक्त केले आहे.' ज्या प्रकारे आमचं कुंकू पुसलं त्याला ऑपरेशन सिंदूर योग्य प्रत्युत्तर'  असल्याचं म्हणताना त्यांनी ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकून डोळ्यात अश्रू तरळल्याची भावना व्यक्त केली आहे. नक्की वाचा: Terrorist Attack in Pahalgam: हल्लेखोरांनी पीएम मोदींची निंदा केली, वडिलांना इस्लामिक श्लोक म्हणायला लावले; पुण्याच्या जखमी संतोष जगदाळे यांंची लेक आसावरी जगदाळे ने सांगितला थरारक प्रसंग.  

प्रगती जगदाळे 'ऑपरेशन सिंदूर' नाव ऐकून भावूक

आसावरी जगदाळे यांची प्रतिक्रिया

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement