PM Modi's Jacket From Recycled PET Bottles: 'Sustainability' चा पुरस्कार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिधान केलं रिसायकल प्लॅस्टिक पासून बनवलेलं खास जॅकेट (See Photo)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संसदेमध्ये रिसायकल प्लॅस्टिक पासून तयार झालेलं निळं जॅकेट परिधान करून पोहचले आहेत.
क्लायमेट चेंज सारख्या विषयावर कठोर पावलं उचलणं ही काळाची गरज असताना केवळ कागदावर त्याची चर्चा न करता प्रत्यक्षात काही गोष्टी आत्मसाद करत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक आज एक उदाहरण जनतेसमोर ठेवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संसदेमध्ये रिसायकल प्लॅस्टिक पासून तयार झालेलं निळं जॅकेट परिधान करून पोहचले आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार, या जॅकेटची किंमत 2 हजारच्या आसपास आहे. 'Sustainability' चा पुरस्कार करण्यासाठी त्यांनी हे जॅकेट परिधान केल्याचं सांगितलं जात आहे.
पहा ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)