PM Narendra Modi Meets His Mother: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधीनगरमध्ये घेतली आपल्या आईची भेट; चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले
दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी आईच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले.
गुजरात विधानसभा 2022 निवडणुकासाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान सोमवारी म्हणजेच उद्या होणार आहे. राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदींनी सलग दोन दिवस इथे रोड शो केले. आज पंतप्रधान आपली आई हीराबेन मोदींना भेटण्यासाठी गांधीनगरमध्ये पोहोचले. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी आईच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले. पंतप्रधानांनी आईजवळ बसून चहाचा आस्वादही घेतला. या गोष्टीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
आपल्या आईला भेटण्यापूर्वी, पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमध्ये प्रमुखस्वामी महाराजांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे उद्घाटन केले. 30 दिवस चालणारा हा महोत्सव 15 डिसेंबरपासून सुरू होत असून, 15 जानेवारीपर्यंत चालणार आहे. या उत्सवासाठी अहमदाबादच्या पश्चिमेला सरदार पटेल रिंग रोडवर 600 एकर जागेवर भव्य आणि दिव्य 'प्रमुखस्वामी महाराज नगर' बांधले जात आहे.
#WATCH | Gujarat: Prime Minister Narendra Modi meets his mother Heeraben Modi at her residence, in Gandhinagar. pic.twitter.com/C4uh1CMOFb
— ANI (@ANI) December 4, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 04, 2022 07:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

