PM Modi's Yoga Event At UN: यूएनमधील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योग कार्यक्रमाने प्रस्थापित केला Guinness World Record; सहभागी झाले होते सर्वाधिक देश

संयुक्त राष्ट्रांचे उच्च अधिकारी, मुत्सद्दी आणि जगभरातील नामवंत व्यक्तींनी या योग सत्रात सहभाग घेतला.

PM Modi's Yoga Event At UN

न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील योग कार्यक्रम पार पडला. आता या कार्यक्रमाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. न्यूयॉर्कमधील यूएन मुख्यालयात योग कार्यक्रमादरम्यान, जास्तीत जास्त राष्ट्रीयत्वे (विविध देश) सहभागी झाले. या कारणास्तव, या कार्यक्रमाचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात योगाचा कोणत्याही एका देशाशी, धर्माशी किंवा वंशाशी संबंध नाही, असे सांगितले. ते म्हणाले की, योग भारतातून आला आहे आणि ही सर्वात प्राचीन परंपरा आहे परंतु त्यावर कोणताही कॉपीराइट नाही. 'योग हा कॉपीराइट, पेटंट आणि रॉयल्टीपासून मुक्त आहे', असे ते म्हणाले.

संयुक्त राष्ट्रांचे उच्च अधिकारी, मुत्सद्दी आणि जगभरातील नामवंत व्यक्तींनी या योग सत्रात सहभाग घेतला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि फर्स्ट लेडी जिल बिडेन यांच्या निमंत्रणावरून मोदी अमेरिका दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यावर न्यूयॉर्कमध्ये आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement