PM Modi’s ‘Mann Ki Baat’ to Resume: पुन्हा सुरु होणार पीएम नरेंद्र मोदींचा 'मन की बात' कार्यक्रम; जून 2024 च्या भागासाठी नागरिकांकडून मागवल्या कल्पना आणि सूचना
निवडणुकीमुळे आलेल्या अल्पशा विरामानंतर आकाशवाणीवर येणाऱ्या मन की बात कार्यक्रमाच्या आगामी भागाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. या महिन्यात 30 जून रोजी मन की बात कार्यक्रम निर्धारित केला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे.
PM Modi’s ‘Mann Ki Baat’ to Resume: लोकसभा निवडणूक 2024 संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मन की बात कार्यक्रम पुन्हा सुरु होणार आहे. पीएम मोदी 3.0 च्या 'मन की बात' कार्यक्रमाची तारीखही समोर आली आहे. निवडणुकीमुळे आलेल्या अल्पशा विरामानंतर आकाशवाणीवर येणाऱ्या मन की बात कार्यक्रमाच्या आगामी भागाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. या महिन्यात 30 जून रोजी मन की बात कार्यक्रम निर्धारित केला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे. नागरिकांनी मन की बात च्या 111 व्या भागासाठी आपले विचार आणि सूचना MyGov खुला मंच किंवा NaMo ॲपवर पाठवाव्यात किंवा 1800 11 7800 या क्रमांकावर ध्वनिमुद्रित कराव्यात, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.
पंतप्रधानांनी एक्स पोस्ट वर म्हटले आहे, ‘निवडणुकांमुळे गेल्या काही महिन्यांत आलेल्या खंडानंतर मन की बात आता परत येत आहे, हे सांगताना मला आनंद होत आहे. या महिन्याचा कार्यक्रम रविवार, 30 जून रोजी होणार आहे. यासाठी तुमचे विचार आणि सूचना पाठवण्याचे आवाहन मी तुम्हा सर्वाना करतो. MyGov ओपन फोरम किंवा नमो ॲपवर तुमचे विचार लिहून पाठवा किंवा 1800 11 7800 या क्रमांकावर तुमचा संदेश ध्वनिमुद्रित करा.’ (हेही वाचा: International Yoga Day 2024: पंतप्रधान मोदी यांच्याकडून उष्ट्रासन योग आसनाचा व्हिडीओ शेअर; शारिरीक जडणघडणीत योगाचे महत्त्व केले अधोरेखीत)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)