PM Narendra Modi यांनी US Vice President JD Vance आणि कुटुंबियांचं दिल्लीत शासकीय निवासस्थानी केलं स्वागत

आज US Vice President JD Vance यांनी दिल्लीत अक्षरधाम मंदिरात दर्शन घेतले आहे. या भारतभेटीत ते आग्रा, जयपूरला देखील भेट देणार आहेत.

PM Modi With JD Vance Family | X @ANI

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष  JD Vanceआणि सेकंड लेडी उषा व्हान्स आणि त्यांच्या मुलांचे दिल्लीतील लोक कल्याण मार्ग येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वागत केले आहे. सध्या  JD Vance चार दिवसीय भारतभेटीवर आले आहे. दरम्यान  JD Vance यांची पत्नी भारतीय वंशाची आहे. आज त्यांनी दिल्लीत अक्षरधाम मंदिरात दर्शन घेतले आहे.  भारत-अमेरिका धोरणात्मक सहकार्य वाढवणे यावर आज त्यांच्यामध्ये चर्चा होणार आहे.  त्यानंतर खास डीनरचं आयोजन करण्यात आलं आहे. या भारतभेटीत ते आग्रा, जयपूरला देखील भेट देणार आहेत. नक्की वाचा: US Vice Presidential Candidate JD Vance च्या पत्नी Usha Vance कोण? जाणून घ्या त्यांच भारताशी असलेलं कनेक्शन काय? 

  PM Narendra Modi यांनी  US Vice President JD Vance यांचे केले स्वागत  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement