New Parliament Building: PM Narendra Modi यांच्यासह केंद्रीय मंत्री, खासदारांनी केला संसदेच्या नव्या इमारतीमध्ये प्रवेश; पहा 'हा' ऐतिहासिक क्षण (Watch Video)
भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणांमध्ये खासदारांनी नव्या इमारतीमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभेच्या चेंबरमध्ये ८८८ सदस्यांसाठी जागांची व्यवस्था करण्यात आली आहे तर राज्यसभेच्या चेंबरमध्ये ३८४ जागांची व्यवस्था करण्यात आली आहे.
PM Narendra Modi यांच्यासह केंद्रीय मंत्री, खासदारांनी आज गणेश चतुर्थीच्या दिवशी संसदेच्या नव्या इमारतीमध्ये प्रवेश केला आहे. जुन्या इमारती मधून आज नव्या इमारतीमध्य्ये प्रवेश करताना मोदींच्या पाठोपाठ सारे खासदार रांगेत चालत नव्या इमारतीमध्ये प्रवेश करताना दिसले. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणा देखील देण्यात आल्या. नव्या इमारतीमध्ये पहिल्याच दिवशी महिला आरक्षणाचे विधेयक मांडलं जाणार आहे. त्यामुळे आता महिलांना 33% आरक्षण मिळणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)