Lockdown in India? मे महिन्यात भारतात लागणार लॉकडाऊन? व्हायरल वृत्ताची पीआयबीकडून पोलखोल;  जाणून घ्या सत्य

महाराष्ट्रासह देशभरात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या वाढते आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारकडून आवश्यक पावले उचलली जात असली तरी, सोशल मीडिया आणि स्वयंघोषीत पत्रकार युट्युबच्या माध्यमांतून निराधार वृत्त देऊ लागले आहेत. अशा लोकांचा पीआयबीने तथ्य पडताळणी करुन पोलखोल करणे सुरु केले आहे.

Fact Check | (File Image)

महाराष्ट्रासह देशभरात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या वाढते आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारकडून आवश्यक पावले उचलली जात असली तरी, सोशल मीडिया आणि स्वयंघोषीत पत्रकार युट्युबच्या माध्यमांतून निराधार वृत्त देऊ लागले आहेत. अशा लोकांचा पीआयबीने तथ्य पडताळणी करुन पोलखोल करणे सुरु केले आहे. पीआयबीने नुकत्याच केलेल्या एका ट्विटनुसार एका युट्युब चॅनलवर वाढत्या कोरोना व्हायरसमुळे मे महिन्यात लॉकडाऊन लागणार असल्याचे वृत्त दिले होते. हे वृत्त पूर्णपणे निराधार असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे पीआयबीने म्हटले आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही वृत्तांवर विश्वास ठेऊ नका असे पीआयबीने म्हटले आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement