भारतातील लोक इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभे, पंतप्रधान मोदी यांचे नेत्यन्याहूना आश्वासन

भारत दहशतवादाचा त्याच्या सर्व प्रकाराचा तीव्र निषेध करतो, असे मोदी यांनी सांगितले

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सध्याच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली कारण त्यांचा देश हमासवर प्रत्युत्तर देणारे हल्ले करत आहे. भारत दहशतवादाचा त्याच्या सर्व प्रकाराचा तीव्र निषेध करतो, असे मोदी यांनी सांगितले. "पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी फोन करून सध्याच्या परिस्थितीबद्दल अपडेट दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या कठीण प्रसंगी भारतातील लोक इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. भारत दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा आणि प्रकटीकरणाचा तीव्र आणि निःसंदिग्धपणे निषेध करतो," असे मोदी यांनी आपल्या X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पाहा पोस्ट -