चोरट्यांचा कहर! विमानात प्रवाशाकडून लाईफ जॅकेटची चोरी; IndiGo Flight मधील व्हिडिओ व्हायरल (Video)

विमानात एका प्रवाशाने लाईफ जॅकेटची चोरी केल्याचे समोर आले आहे. त्याला त्याची बॅग उघडण्यास सांगताच चोरी केलेले लाईफ जॅकेट पुन्हा मिळाले.

Photo Credit- X

IndiGo Flight Life Jacket Theft: इंडिगोच्या विमानातून एका प्रवाशाने लाईफ जॅकेट चोरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विमानात एका प्रवाशाला विमानातील क्रू मेंबपने ही चोरी करताना पकडले. त्याला त्याची बॅकपॅक उघडण्यास सांगीतले तेव्हा त्यामध्ये लपवलेले लाईफ जॅकेट पुन्हा जप्त करण्यात आले. आपत्कालीन वापरासाठी प्रत्येक सीटखाली ठेवलेले लाईफ जॅकेट हे प्रवासादरम्यान, अत्यंत महत्त्वाचे सुरक्षा उपकरण आहे. त्याच्याशी छेडछाड करणे किंवा काढून टाकणे हे विमान सुरक्षा नियमांचे उल्लंघन आहे. या व्हिडिओमध्ये, लाईफ जॅकेट चोरताना पकडलेला माणूस घाबरलेला दिसतो. त्याशिवाय चोरीचे स्पष्टीकरण विचारताच त्याचे उत्तर देण्यास अमर्थ असल्याचे दिसतो.

इंडिगो फ्लाइटमध्ये लाईफ जॅकेट चोरताना एकला पकडले

 

 

View this post on Instagram

 

A post shared by AVIATION NEWS (@aviationnews___)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement