Ola Showroom Fire: कर्नाटकातील कलबुर्गीमध्ये नाराज ग्राहकाने ईव्ही शोरूमला लावली आग; व्हिडिओ व्हायरल (Watch)
त्याने वारंवार भेट देऊनही शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी समस्या सोडवली नाही
Ola Showroom Fire: कर्नाटकातील कलबुर्गी येथे एका व्यक्तीने इलेक्ट्रिक शोरूमला आग लावण्याची घटना समोर आली आहे. मोहम्मद नदीम असे या व्यक्तीचे नाव असून, त्याला त्याच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरसाठी योग्य ग्राहक सेवा मिळत नसल्याच्या रागात त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. या व्यक्तीने महिन्याभरापूर्वी 1.4 लाख रुपयांची ओला ई-स्कूटर खरेदी केली होती. पण एक-दोन दिवसांनी त्यामध्ये समस्या निर्माण होऊ लागल्या. तो अनेकवेळा शोरूममध्ये गेला, मात्र स्कूटरच्या समस्यांचे निराकरण झाले नाही. त्यानंतर त्याने संतापून शोरूमला आग लावली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ‘नदीमने 20 दिवसांपूर्वी शोरूममधून ओला स्कूटर खरेदी केली होती, परंतु त्याला वारंवार समस्या येत होत्या. त्याने वारंवार भेट देऊनही शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी समस्या सोडवली नाही. यानंतर कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाला कंटाळून त्याने मंगळवारी शोरूममध्ये पेट्रोल ओतून पेटवून दिले. याप्रकरणी कलबुर्गी चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या आगीच्या घटनेत सुमारे 6 इलेक्ट्रिक स्कूटर जळून खाक झाल्या आहेत. भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनीच्या शोरूममध्ये आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. (हेही वाचा: Maruti Suzuki Recalls 2,555 Alto K10: मारुती सुझुकीने परत मागवल्या 2,555 अल्टो के 10 गाड्या; जाणून घ्या कारण)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)