Odisha: ओडिशाचे काँग्रेस आमदार Tara Prasad Bahinipati यांनी सार्वजनिक कार्यक्रमात पत्नीला अनेकवेळा दिलान 'फ्लाइंग किस', व्हिडिओ व्हायरल (Watch)

व्हिडिओमध्ये, राजकारणी आपल्या पत्नीला हार घालताना दिसत आहे. त्यानंतर ते आपल्या पत्नीचा हात हातात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते.

Tara Prasad Bahinipati

काँग्रेस आमदार तारा प्रसाद बहिनिपती हे एका सार्वजनिक कार्यक्रमात पत्नी मिनाखी बहिनीपती यांना चक्क फ्लाइंग किस करताना दिसले आहेत. ही घटना कॅमेरात कैद झाली असून, आता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बहिनीपती हे ओडिशातील जेपोर मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य आहेत. व्हिडिओमध्ये, राजकारणी आपल्या पत्नीला हार घालताना दिसत आहे. त्यानंतर ते आपल्या पत्नीचा हात हातात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. त्यानंतर ते सर्वांच्यासोमोर पत्नीला अनेकवेळा फ्लाइंग किस देतात. याआधी काँग्रेस आमदार ओडिशा विधानसभेचे अध्यक्ष एसएन पात्रो यांना फ्लाइंग किस देताना दिसले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement