Odisha Lok Sabha Election Results: आंध्र प्रदेशनंतर आता ओडिशामध्येही BJP ची मोठी आघाडी; 74 जागांवर पुढे, सत्ता स्थापन करण्याची शक्यता

ओडिशामध्येही भाजप आणि एनडीएसाठी चांगली बातमी असू शकते. ओडिशा मध्ये एकूण 147 जागा असून, बहुमतासाठी 74 जागा आवश्यक आहेत. अशात बीजेडी 56, भाजपा 74, काँग्रेस ​​11 आणि इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत.

Odisha Lok Sabha Election Results: आंध्र प्रदेशनंतर आता ओडिशामध्येही BJP ची मोठी आघाडी; 74 जागांवर पुढे, सत्ता स्थापन करण्याची शक्यता
BJP | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Odisha Lok Sabha Election Results: लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल हळू हळू समोर येत आहेत. देशात कोणाची सत्ता येणार याबाबत अजूनतरी चित्र स्पष्ट झाले नसले तरी, काही राज्यांमध्ये भाजपची आघाडी दिसत आहे. आंध्र प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप), तेलगू देसम पार्टी (टीडीपी) आणि जनसेना पक्ष (जेएसपी) यांचा समावेश असलेला एनडीए सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज दिसत आहे. दुसरीकडे, ओडिशामध्येही भाजप आणि एनडीएसाठी चांगली बातमी असू शकते. ओडिशा मध्ये एकूण 147 जागा असून, बहुमतासाठी 74 जागा आवश्यक आहेत. अशात बीजेडी 56, भाजपा 74, काँग्रेस ​​11 आणि इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत. आंध्रप्रदेशनंतर ओडिशामध्येही भाजप सत्ता स्थापन करू शकते असे दिसत आहे. ओडिशाचे नवीन पटनायक हे मार्च 2000 पासून 24 वर्षे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मात्र यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी झटका देणारी ठरू शकते.

पहा पोस्ट- 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2024 12:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).