Gyanesh Kumar-Sukhbir Singh Sandhu Took ECI Charge : ज्ञानेश कुमार आणि डॉ सुखबीर सिंग संधू यांनी निवडणूक आयुक्तपदाचा स्विकारला पदभार

माजी आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर निवडणूक आयोगाचे आयुक्तपद रिकामे होते.

Photo Credit -Twitter

Gyanesh Kumar-Sukhbir Singh Sandhu Took ECI Charge : निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी नेमणूक झालेले ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar)आणि सुखबीर सिंह संधू (Dr Sukhbir Singh Sandhu) यांनी आज त्यांचा पदभार स्विकारला. लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असतानाच माजी आयुक्त अरुण गोयल यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यानंतर निवडणुक आयोगाचे आयुक्तपद रिकामे होते. आता पंतप्रधानांच्या (PM Modi)समितीने दोन निवृत्त सनदी अधिकाऱ्यांची आयोगावर नियुक्ती केली. ज्यात ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू यांची निवड केली आहे. अरुण गोयल यांच्या राजीनाम्यामागे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याशी गोयल यांचे झालेले मतभेद कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. नियमावर बोट ठेवून काम करणारे अत्यंत शिस्तबद्ध अधिकारी अशी ख्याती गोयल यांचे राजीव कुमार यांच्याशी पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीच्या आढाव्यावरून तीव्र मतभेद झाल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा : Election Commissioner Arun Goel Resigns: लोकसभेच्या संग्रामापुर्वीच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)