New Parliament Inauguration: 'नव्या संसद भवनाच्या इमारतीला शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस उपस्थित राहणार नाहीत'

काँग्रेससह 19 विरोधी पक्षांनी एक संयुक्त निवेदन जारी करून म्हटले आहे की "संसदेतून लोकशाहीचा आत्मा बाहेर काढला गेला असताना नवीन इमारतीला किंमत उरली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस (Photo Credits-Facebook)

नव्या संसद भवन इमारतीच्या उद्घाटनावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. यात आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले आहे की, नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि आमचे सर्व खासदार सहभागी होणार नाहीत.

दरम्यान, नव्या संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर काँग्रेस आणि जवळपास 19 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. काँग्रेससह 19 विरोधी पक्षांनी एक संयुक्त निवेदन जारी करून म्हटले आहे की "संसदेतून लोकशाहीचा आत्मा बाहेर काढला गेला असताना नवीन इमारतीला किंमत उरली नाही.