New Government Formation: एनडीएच्या बैठकीत Nitish Kumar आणि Chandrababu Naidu यांनी सादर केले समर्थन पत्र; नरेंद्र मोदी लवकरच करणार सरकार स्थापनेचा दावा

एनडीएची बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी तासभर चालली. यामध्ये 10 हून अधिक पक्षांचे नेते सहभागी झाले होते.

एनडीए

New Government Formation: लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. एनडीए आघाडीला 292 जागा मिळाल्या आहेत. तर, इंडिया युतीला 243 जागा मिळाल्या आहेत. यावेळी एकहाती बहुमताचा आकडा गाठण्यात भाजपला यश आलेले नाही. मात्र, टीडीपी आणि जेडीयूसारख्या पक्षांमुळे मोदी सरकारने तिसऱ्यांदा सरकार स्थापनेकडे वाटचाल केली आहे. आजच्या एनडीएच्या बैठकीमध्ये नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोघांनीही भाजपला पाठिंबा देणारी पत्रे सादर केली आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदी आजच सरकार स्थापनेचा दावा करू शकतात. यासाठी सर्व एनडीए पक्षांचे नेते संध्याकाळी 7.45 वाजता राष्ट्रपती भवनात पोहोचतील. लोकसभा निवडणुकीनंतरच्या एनडीएच्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दुसरीकडे मोदींनी राजीनामा दिल्यानंतर आणि मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस केल्यानंतर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभा विसर्जित केली.

एनडीएची बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी तासभर चालली. यामध्ये 21 पक्षांचे नेते सहभागी झाले होते. यामध्ये जेडीयु नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू, सुदेश महतो, आरएलडीचे जयंत चौधरी, जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चिराग पासवान, अनुप्रिया पटेल, जीतनराम मांझी यांचा समावेश आहे. एनडीएच्या नेत्यांनी मांडलेल्या प्रस्तावात एनडीएच्या नेत्यांनी एकमताने नरेंद्र मोदी यांची गट नेता म्हणून निवड केली आहे. यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा मित्रपक्षांसोबत सरकार स्थापनेबाबत एकत्र चर्चा करतील. (हेही वाचा: World Leaders Congratulate Narendra Modi: आतापर्यंत 50 हून अधिक जागतिक नेत्यांनी नरेंद्र मोदींचे केले अभिनंदन; 8 जूनला घेऊ शकतात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपत)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now