Narhari Zirwal Alleged Viral Video: अमोल मिटकरींचा नरहरी झिरवाळांना पाठिंबा; व्हायरल व्हिडिओ म्हणजे 6 महिन्यांपूर्वी रचलेला राजकीय कट असल्याचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर खळबळजनक ट्विट केले आहे. हा व्हिडिओ सात महिन्यांपूर्वीचा असून एका विशिष्ट प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी तो आता मुद्दाम बाहेर काढण्यात आल्याचा आरोप मिटकरींनी केला आहे.

Amol Mitkari (Pic Credit - Twitter)

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मिटकरी यांच्या मते, हा व्हिडिओ सात महिन्यांपूर्वीच तयार करून ठेवण्यात आला होता आणि आता एका विशिष्ट राजकीय हेतूने तो जाणीवपूर्वक प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यांनी यामागे "झारीतील शुक्राचार्य" कोण, असा सवाल उपस्थित करत खळबळ उडवून दिली आहे.

अमोल मिटकरी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, हा व्हिडिओ सहा ते सात महिन्यांपूर्वी काढून ठेवण्यात आला होता. झिरवाळ यांनी जेव्हा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा वहिनी (सुनेत्रा पवार) यांची निवड व्हावी अशी इच्छा व्यक्त केली, तेव्हापासूनच त्यांना लक्ष्य केले जात आहे. मिटकरींच्या मते, प्रथम त्यांच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा (ACB) ट्रॅप लावण्याचा प्रयत्न झाला आणि आता हा व्हिडिओ बाहेर काढला गेला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement