Narendra Modi Oath-Taking Ceremony Live Streaming: नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ; पहा राष्ट्रपती भवनातून सोहळ्याचे थेट प्रक्षेपण (Video)

राष्ट्रपती भवनात हा सोहळा आयोजित केला जाणार आहे. पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण होणार आहे.

Narendra Modi (PC - X/ANI)

Narendra Modi Oath-Taking Ceremony Live Streaming: लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये विजय मिळवल्यानंतर, एनडीए सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. य्याआधी 7 जूनला एनडीए पक्षांनी आणि नवनिर्वाचित खासदारांनी नरेंद्र मोदी यांची एनडीएचा नेता म्हणून निवड केली. आता नरेंद्र मोदी यांनी आपल्या तिसऱ्या टर्मसाठी रविवार, 9 जून रोजी सायंकाळी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. आज त्यांच्या मंत्रिमंडळात सामील होणारे मंत्रीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. पंतप्रधानांचा शपथविधी सोहळा अनेक अर्थांनी खास असेल. या सोहळ्यात एकीकडे जगभरातील प्रमुख नेते सहभागी होणार आहेत, तर दुसरीकडे स्वच्छता कर्मचारी, ट्रान्सजेंडर आणि मजूरही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहेत. नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला एकूण 8,000 पाहुणे उपस्थित राहू शकतात. त्यादृष्टीने दिल्लीत जोरदार तयारी केली गेली आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची शपथ देणार आहेत. राष्ट्रपती भवनात हा सोहळा आयोजित केला जाणार आहे. पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण होणार आहे. याशिवाय, तुम्ही राष्ट्रपती भवन, पीआयबी, नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरही ते पाहू शकता. (हेही वाचा: Narendra Modi Cabinet Ministers List: नितीन गडकरी, पियुष गोयल यांच्यासह महाराष्ट्रातील सहा खासदारांचा मंत्रीमंडळात समावेश; Devendra Fadnavis यांनी सांगितली यादी)

या ठिकाणी पहा नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचे थेट प्रक्षेपण- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)