Mysuru-Darbhanga 12578 Express Accident: तामिळनाडूमध्ये मोठा रेल्वे अपघात; म्हैसूर-दरभंगा एक्सप्रेसची मालगाडीला धडक, डबे रुळावरून घसरले (Watch Video)
म्हैसूरहून बिहारमधील दरभंगा येथे जाणारी बागमती एक्स्प्रेस चेन्नईजवळ मालगाडीला धडकली, त्यानंतर ट्रेनला आग लागली. ही घटना कावराईपेट्टई रेल्वे स्थानकाजवळ घडली.
Mysuru-Darbhanga 12578 Express Accident: तामिळनाडूमध्ये मोठा रेल्वे अपघात झाला आहे. म्हैसूर-दरभंगा एक्सप्रेसची 20.30 च्या सुमारास एका मालगाडीला धडक बसली आहे. त्यानंतर सहा डबे रुळावरून घसरले. म्हैसूरहून दरभंगा येथे जाणारी बागमती सुपरफास्ट पेरांबूरहून सुटल्यानंतर 10 मिनिटांनी रुळावरून घसरली. गाडीचे मागील 8 डबे पूर्णपणे खराब झाले आहेत. म्हैसूरहून बिहारमधील दरभंगा येथे जाणारी बागमती एक्स्प्रेस चेन्नईजवळ मालगाडीला धडकली, त्यानंतर ट्रेनला आग लागली. ही घटना कावराईपेट्टई रेल्वे स्थानकाजवळ घडली. या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाल्याची शक्यता आहे. अहवालानुसार कोणतीही जीवितहानी झाली नाही. मेडिकल रिलीफ व्हॅन आणि बचाव पथक चेन्नईहून घटनास्थळी पोहोचत आहे. रेल्वे अधिकारी अपघातस्थळी दाखल झाले आहेत. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. (हेही वाचा: Conspiracy To Overturn Train: पाटणा-गया रेल्वे मार्गावर ट्रेन उलटवण्याचा कट, रुळावर ठेवला मोठा दगड; थोडक्यात वाचले इस्लामपूर-हटिया एक्सप्रेसमधील प्रवाशांचे प्राण)
तामिळनाडूमध्ये मोठा रेल्वे अपघात-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)