Muslim Person's Hindu Custom Wedding Card: मुस्लिम व्यक्तीने आपल्या मुलाच्या लग्नासाठी छापली हिंदू रितीरिवाजानुसार आमंत्रणे पत्रे; फोटो व्हायरल

या कार्डमध्ये वधू, वर आणि कुटुंबातील सदस्यांची नावे मुस्लिम आहेत. पण हे कार्ड संपूर्ण हिंदू रितीरिवाजानुसार छापण्यात आले आहे.

Muslim Person's Hindu Custom Wedding Card

Muslim Person's Hindu Custom Wedding Card: बहराइच जिल्ह्यातील एका मुस्लिम तरुणाची लग्नपत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कार्डमध्ये वधू, वर आणि कुटुंबातील सदस्यांची नावे मुस्लिम आहेत. पण हे कार्ड संपूर्ण हिंदू रितीरिवाजानुसार छापण्यात आले आहे. यामध्ये गणपतीच्या फोटोसोबत एक श्लोकही लिहिला आहे. बहराइच जिल्ह्यातील सफीपूर गावात राहणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीने आपल्या मुलाच्या लग्नासाठी हिंदू रितीरिवाजांनुसार निमंत्रण पत्रिका छापली आहे. हा विवाह 29 फेब्रुवारीला होणार आहे. मुलाचे वडील सफीपूर गावातील रहिवासी अजुहल कमर यांनी सांगितले की, त्यांच्या हिंदू बांधवांना निमंत्रण पत्रिका समजावी म्हणून त्यांनी ती हिंदू रितीरिवाजानुसार छापली आहे. त्यांनी इतर काही कार्ड उर्दूमध्येही छापले आहेत. अशाप्रकारे मुस्लिम समाजातील या व्यक्तीचे कार्ड हिंदू-मुस्लिम ऐक्याचे उदाहरण देत आहे. (हेही वाचा: महिलेने चुकीच्या मार्गावर चालवली गाडी; अडवले असता ट्रॅफिक होमगार्डवर केला हल्ला, कपडे फाडले; Banjara Hills मधील घटना)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now