Muslim Girls Are Forced Into Marriage With Hindus: 'मुस्लीम मुलींचे अपहरण करून त्यांचे हिंदूंशी लावले जात आहे जबरदस्तीने लग्न'; केरळचे मुस्लिम नेते Nasser Faizi यांचा आरोप

फैजी म्हणाले, केरळमधील CPM, DYFI आणि SFI असे पक्ष आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देत आहेत आणि त्यासाठी मुस्लिम मुलींचे अपहरण करून त्यांना हिंदूंसोबत जबरदस्तीने लग्न करण्यास भाग पाडले जात आहे.

Muslim Girls Are Forced Into Marriage With Hindus: 'मुस्लीम मुलींचे अपहरण करून त्यांचे हिंदूंशी लावले जात आहे जबरदस्तीने लग्न'; केरळचे मुस्लिम नेते Nasser Faizi यांचा आरोप
Muslim Woman | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Muslim Girls Are Forced Into Marriage With Hindus: केरळमधील समस्थ केरळ जेम-इय्यातुल उलामा (Samastha Kerala Jem-iyyathul Ulama) ची युवा शाखा असलेल्या सुन्नी युवाजन कार्यक्रम (SYS) चे सचिव नासेर फैजी यांनी राज्यातील आंतरधर्मीय विवाहाबद्दल मोठा आरोप केला आहे. फैजी म्हणाले, केरळमधील CPM, DYFI आणि SFI असे पक्ष आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन देत आहेत आणि त्यासाठी मुस्लिम मुलींचे अपहरण करून त्यांना हिंदूंसोबत जबरदस्तीने लग्न करण्यास भाग पाडले जात आहे. हिंदू किंवा मुस्लिमांशी लग्न करणे म्हणजे धर्मनिरपेक्षता आहे, असे काहींना वाटते. याविरोधात महाल समित्यांनी सतर्क राहावे, अशी मागणीही नसर फैजी यांनी केली. कोझिकोडमधील कोइलांडी येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना फैझी यांनी हे भाष्य केले. नासेर फैजी पुढे म्हणाले की, आपल्याच समाजात विवाह करण्याची प्रथा भारतात पाळली जात आहे आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी महल समित्यांनी म्हणजेच मुस्लिम धर्मीय संघटनांनी तयार असले पाहिजे. (हेही वाचा: Cross-Border Love Story: प्रियकरासाठी सीमा ओलांडून पाकिस्तानी तरुणी भारतात दाखल, पाच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर जानेवारीमध्ये उडवणार लग्नाचा बार)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 06, 2023 07:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).