Mumbai Airport: मुंबई विमानतळारुन तब्बल 4.1 कोटी रुपयांचे विदेशी चलन जप्त
ज्याची किंमत भारतीय रुपयानुसार सुमारे 4.1 कोटी रुपये आहे. मुंबई एअर इन्व्हेस्टिगेशन युनिटने केलेल्या लक्ष्यित ऑपरेशनमध्ये, Fly Dubai flight FZ 446 द्वारे दुबईला निघालेल्या तीन भारतीय प्रवाशांच्या कुटुंबाला रोखण्यात आले.
मुंबई विमानतळ सीमा शुल्क विभागाने (Mumbai Airport Customs) गुरुवारी 4,97,000 डॉलर किमतीचे विदेशी चलन जप्त केले. ज्याची किंमत भारतीय रुपयानुसार सुमारे 4.1 कोटी रुपये आहे. मुंबई एअर इन्व्हेस्टिगेशन युनिटने केलेल्या लक्ष्यित ऑपरेशनमध्ये, Fly Dubai flight FZ 446 द्वारे दुबईला निघालेल्या तीन भारतीय प्रवाशांच्या कुटुंबाला रोखण्यात आले. कुटुंबात दोन वृद्ध प्रवासी आणि अन्य एक पुरुष प्रवासी होता. या कुटुंबाकडे कस्टमने केलेल्या तपासात त्यांच्याकडून विदेशी चलन जप्त करण्यात आले.
ट्विट
मुंबई विमानतळ सीमा शुल्क विभागाकडून तीनही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. या तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तिघांकडून एकूण 4,97,000 USD डॉलर इतक्या रकमेचे विदेशी चलन जप्त करण्यात आले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)