Mukhtar Ansari Death: मुख्तार अन्सारी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; बांदा मेडिकल कॉलेजमध्ये घेतला अखेरचा श्वास- Reports

बांदा मेडिकल कॉलेजने अद्याप मुख्तार अन्सारीच्या मृत्यूला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मऊ, गाझीपूर आणि बांदामध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Mukhtar Ansari (Photo Credit - ANI)a

Mukhtar Ansari Death: बांदा तुरुंगात बंद माफिया डॉन मुख्तार अन्सारीचा मृत्यू झाला आहे. तुरुंगात हृदयविकाराचा झटका आल्यानंतर मुख्तार यांना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना प्रथम आयसीयू आणि नंतर सीसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तुरुंगात बेशुद्ध पडल्यानंतर मुख्तार अन्सारी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 9 डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. मुख्तार अन्सारी यांना रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला आणि ते बेशुद्ध झाले व त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बांदा कारागृहाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. मऊ, गाझीपूर आणि बांदामध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बांदा मेडिकल कॉलेजच्या बाहेर मोठ्या प्रमाणात निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. डीजीपी मुख्यालयाने दक्षता ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. (हेही वाचा: Delhi Hospitals Children Deaths: दिल्लीच्या 'या' रुग्णालयांमध्ये दर दोन दिवसांमध्ये पाच मुलांचा मृत्यू; RTI मधून मोठा खुलासा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now