MP: रस्त्यांची अवस्था बिकट असल्याने रूग्णवाहिका अडकली; गरोदर महिलेने रस्त्याच्या कडेला दिला बाळाला जन्म (Watch Video)

खराब झालेले रस्ते आणि तुंबलेल्या नाल्यामुळे रुग्णवाहिका घरापर्यंत पोहोचू न शकल्याने 27 वर्षीय गर्भवती महिलेने रस्त्याच्या कडेला जन्म दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

women-delivers-baby । Twitter

मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील एका गावात खराब झालेले रस्ते आणि तुंबलेल्या नाल्यामुळे रुग्णवाहिका  घरापर्यंत पोहोचू न शकल्याने 27 वर्षीय गर्भवती महिलेने रस्त्याच्या कडेला जन्म दिल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रसुतीनंतर बाळ आणि नवमाता दोघांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने दोघांचीही स्थिती ठीक आहे. अशी घटना याच भागात यापूर्वीही 2-3 वेळेस झाली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)