MP Prajwal Revanna Suspended: कथित सेक्स स्कँडलनंतर खासदार प्रज्वल रेवन्ना यांना मोठा झटका; JDS मधून निलंबित, पक्षाच्या कोअर कमिटीचा निर्णय

या सेक्स स्कँडलमध्ये देवे गौडा यांचा आमदार मुलगा एचडी रेवन्ना आणि नातू खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्यावर लैंगिक शोषण, सेक्स व्हिडिओ रेकॉर्डिंग, धमकावणे, कट रचणे असे आरोप आहेत.

MP Prajwal Revanna Suspended: कर्नाटकातील हसन मतदारसंघाचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्या कथित सेक्स स्कँडलमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या सेक्स स्कँडलच्या खुलाशानंतर रेवन्ना देश सोडून पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. खासदार प्रज्वल रेवन्ना हे माजी पंतप्रधान आणि जेडीएस पक्षाचे संस्थापक एचडी देवे गौडा यांचे नातू आहेत. यावेळीही त्यांनी हसन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आहे. आता या प्रकरणाचा मोठा गदारोळ पाहता जेडीएसने प्रज्वल रेवन्ना यांना पक्षातून निलंबित केले आहे. जेडीएसच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच प्रज्वल रेवन्ना यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली आहे.

या सेक्स स्कँडलमध्ये देवे गौडा यांचा आमदार मुलगा एचडी रेवन्ना आणि नातू खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्यावर लैंगिक शोषण, सेक्स व्हिडिओ रेकॉर्डिंग, धमकावणे, कट रचणे असे आरोप आहेत. जेडीएस समितीचे सदस्य जीटी देवे गौडा म्हणाले की, राज्य सरकारने याप्रकरणी एसआयटी स्थापन केली आहे, आम्ही त्याचे स्वागत करतो. चौकशी होईपर्यंत आम्ही याप्रकरणी कोणतेही वक्तव्य करणार नाही. आम्ही तपासात पूर्ण सहकार्य करू. (हेही वाचा: Prajwal Revanna Sex Video Row: एचडी देवे गौडा यांचा मुलगा H.D. Revanna व नातू प्रज्वल रेवण्णा यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप; जाणून घ्या काय आहे कर्नाटकातील सेक्स स्कँडल)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now