Money Laundering Case: पेटीएम पेमेंट्स बँकेला मोठा झटका; Financial Intelligence Unit ने मनी लाँड्रिंग प्रकरणात ठोठावला 5.49 कोटी रुपयांचा दंड

फायनान्शियल इंटेलिजेंस युनिट-इंडिया (FIU-IND) ने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडवर मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा, 2002 (PMLA) अंतर्गत त्याच्या दायित्वांचे उल्लंघन केल्याबद्दल 5,49,00,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Paytm (Photo Credits: IANS)

Money Laundering Case: पेटीएम पेमेंट्स बँकेला आणखी एक धक्का बसला आहे. मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत उल्लंघन केल्याबद्दल पेटीएम पेमेंट्स बँकेला 5 कोटी रुपयांहून अधिक दंड ठोठावण्यात आला आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, फायनान्शियल इंटेलिजेंस युनिट-इंडिया (FIU-IND) ने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडवर मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा, 2002 (PMLA) अंतर्गत त्याच्या दायित्वांचे उल्लंघन केल्याबद्दल 5,49,00,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की बेकायदेशीर क्रियाकलापांमध्ये गुंतलेल्या संस्थांनी पेटीएम पेमेंट्स बँकेत उघडलेल्या खात्यांद्वारे गुन्ह्यातील रकमेचा गैरवापर केला आहे. (हेही वाचा: Gross GST Collections: फेब्रुवारीमध्ये सकल जीएसटी संकलनात 12.5% वाढ; प्राप्त झाले 1.68 लाख कोटी रुपये)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)