मुंबई पोलिसांनाही Money Heist ची भुरळ; Khakhi Band ने सादर केले 'Bella Ciao' थीम सॉंग (Watch Viral Video)

आता आज हा सिझन जगभरातील नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे

मुंबई पोलिसांनी सादर केले Bella Ciao (Photo credit : Twitter)

गेल्या अनेक महिन्यांपासून नेटफ्लिक्सची लोकप्रिय सिरीज मनी हाईस्टच्या सीझन 5 ची (Money Heist Season 5) उत्सुकता होती. आता आज हा सिझन जगभरातील नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे व त्यानंतर सोशल मिडियावर याच सिरीजबाबत चर्चा सुरु आहे. महत्वाचे म्हणजे या सिरीजची भुरळ मुंबई पोलिसांनाही पडली आहे. या सिरीजमधील गाणे ‘बेला चाओ’ हे अगदी पहिल्या सिझनपासून लोकप्रिय ठरले आहे, आता ‘खाकी बँड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई पोलीस बँडने ‘बेला चाओ’ हे थीम साँग सादर केले आहे. सध्या सोशल मिडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नेटिझन्सकडून मुंबई पोलिसांचे कौतुक होत आहे.

मुंबई पोलिसांनी सादर केले Money Heist चे थीम सॉंग Bella Ciao

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)